देवळा | ज्ञानेश्वर आढाव
आज दि.१३/१२/२०२१ रोजी जिल्हा परिषद शाळा दत्तनगर येथे शालेय प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून मुलांना शाळेत प्रवेश बंद होता.राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्याने शासनाने ग्रामीण भागातील १ली ते ४थी च्या वर्गांना काही नियम व अटींचे पालन करून वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
त्यानुसार आज जिल्हा परिषद शाळा दत्तनगर (वा) ता.देवळा येथे मुलांना सजविलेल्या ट्रॅक्टर मधून प्रभात फेरी काढून वाजत गाजत शाळेपर्यंत आणले व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले . याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य , पालक ,ग्रामपंचायत सदस्य, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री जनार्दन पगार यांनी प्रास्ताविक करून नियम व अटींविषयी मार्गदर्शन केले व उपशिक्षिका
जयश्री पगार यांनी आभार मानले.
जयश्री पगार यांनी आभार मानले.