राज्यातील 10 विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतलाय. या शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये समायोजित केले जाणार आहे. दूरच्या शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची सोय केली जाणार आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या अध्यादेशानुसार, अमरावती, पालघर, नंदुरबार, कोल्हापूर, अकोला, नाशिक, सिंधुदुर्ग, ठाणे, नगर जिल्ह्यातील अनेक शाळा बंद करण्यात येणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात 47 शाळांचा समावेश असल्याचे समजते.
*शाळा बंद करण्यामागील कारणे*
▪️ शाळांमध्ये 1 ते 5 विद्यार्थी संख्या
▪️ पाचवी ते आठवीचे वर्ग उपलब्ध नसणे
▪️ नव्या शैक्षणिक धोरणानुसार ‘क्लस्टर’ निर्मितीच्या दृष्टीने पावले
*पर्यायी मार्ग शोधावा*
स्थानिक पातळीवर ‘शिक्षक मित्रा’मार्फत या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवावे. हे विद्यार्थी 10 वर्षांच्या आतील आहेत. त्यामुळे पालक त्यांना लांबच्या शाळेत पाठवणार नाहीत. त्यामुळे सरकारने पर्यायी मार्ग शोधावा, अशी मागणी मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी केलीय.