मालेगाव ( मनोहर शेवाळे ) सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, भ्रष्ट व्यवस्था आणि निष्क्रिय कार्यपद्धती दाखवल्यामुळे काही लोकांच्या पोटात पोठशूळ उठले म्हणून त्या भ्रष्ट लोकांच्या सांगण्यावरुन गुंडानी हा भ्याड हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आडत घेत असल्याने त्या संदर्भात आवाज उठविला होता त्यामुळे घरावर हल्ला करण्यात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे
बाजार समितीत ज्या व्यापाऱ्याचा भ्रष्टाचार उघड केला होता त्याच्या सांगण्याने हा प्रकार घडला असल्याची चर्चा असून रात्री उशिरा झाला गुन्हा दाखल झाला असून यासंदर्भात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.