📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगावातल्या घटनेवर सलमान खान संतापला; अशा प्रकारे व्यक्त केली नाराजी

मालेगाव (सचिन पगारे) मालेगाव शहरात शुक्रवारी सुभाष थिएटरमध्ये काही वात्रट प्रेक्षकांनी जोरदार फटाके फोडले; यासंबंधीचा व्हिडीओ सर्वच न्यूज चॅनल ने प्रदर्शित केला, आणि ही बातमी सलमान पर्यंतही पोहोचली त्यामुळे सलमान नाराज झाला असून आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे इंस्टाग्राम वर मेसेज टाकून आवाहन केले आहे की कुठल्याही चाहत्याने सिनेमागृहात फटाके नेऊ नयेत व सिनेमागृह चालकांनाही सूचना केली आहे की  प्रेक्षक सिनेमागृहात फटाके नेताय का? याकडे लक्ष ठेवावे.
इंस्टाग्राम वर व्हिडिओ सलमानने शेअर केला आहे, ज्यामध्ये काही अतिउत्साही टवाळखोर प्रेक्षक सिनेमागृहातच फटाके फोडत आहेत, यामुळे मोठी आग लागून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे तसेच तुमच्या ही जीवाला धोका होऊ शकतो असे म्हणत आपल्या सर्व चाहत्यांना सलमानने फटाके येऊ नयेत असा सल्ला वजा विनंती केली आहे.
शुक्रवारी सलमानचा अंतिम हा चित्रपट चित्रपटगृहात सुरू असताना सलमान खान चे एन्ट्री वर कुठल्यातरी प्रेक्षकाने फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली चित्रपट गृहात मोठा गोंधळ उडाला होता, सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी अनेक जणांना धावपळीमुळे खुर्च्या लागल्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत तसेच अंगावर फटाक्यांच्या जळते अंश पडल्यामुळे अनेकांच्या कपड्यांना छिद्रे  पडली आहेत व काहींना चटकाही लागला आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे

त्यामुळे या गोष्टीची दखल खुद्द सलमानलाही घ्यावी लागली, व त्याने आपली नाराजी व्यक्त करत इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर केली आहे




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने