📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

८ वर्षीय मुलाला काठीने अमानुष मारहाण करणाऱ्या नराधमाच्या व्हायरल व्हिडीओचे सत्य आले समोर!

मालेगाव ( जय योगेश पगारे )  केवळ ८ वर्षीय मुलाला काठी तुटेपर्यंत निर्दयीपणे बेदम मारहाण करणाऱ्या एका इसमाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. विशेष म्हणजे हा व्हिडीओ त्या इसमाने स्वतःच्याच लहान मुलीला शूट करण्यास सांगितल्याचे दिसतेय.

व्हिडिओमध्ये बोलली जात असलेली भाषा मराठीच आहे. त्या नराधमाला पकडण्यासाठी हा व्हिडीओ व्हायरल करा, पोलिसांपर्यंत पोहचवा असे आवाहन करणारे मेसेज, फेसबुक पोस्ट्स या व्हिडीओसह जोरदार व्हायरल होत आहेत. 

अशोक घनटे (३८) असे या व्यक्तीचे नाव असून, तो हैदराबादमधील ट्रूप बझार येथील एका दुकानात सेल्समन म्हणून काम करतो, तो छत्रीनाका येथील त्याच्या घरी पत्नी, एक मुलगा आणि मुलीसह राहतो. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी हा मुलगा आणि शेजारील मुले घरात असताना मुलाने काहीतरी चूक केली, त्यामुळे यावर संतापलेल्या घनटे याने काठी (ऊस) घेऊन मुलाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, 
लहान मुलगी व मार खाणारा मुलगा  त्याच्या वडिलांना मारहाण करणे थांबवण्याची विनंती करताना दिसत आहे, तरीही नशेत असलेला हा नराधम त्याला क्रूरपणे मारहाण करतच आहे.

 मुलगी रडत रडत पुन्हा त्याला थांबण्याची विनंती करताना  स्पष्टपणे  ऐकू येते, पण काठी(ऊस ) तुटल्यानंतरही घनटे ह्या मुलाला अत्यंत निर्दयीपणे अमानुष  मारहाण करतच आहे.

 मुलाने पलंगाखाली लपण्याचा प्रयत्न केला पण तरीही बाप थांबत नाही,  हा सर्व संतापजनक प्रकार  शेजाऱ्यांनी बघितला व तातडीने पोलिसांना याची माहिती दिली, पोलिसांनी तातडीने धाव घेत त्या लहान मुलाची सुटका केली व त्या नराधम बापास अटक केली आहे 

आरोपी इसम नशेत होता, ८ वर्षीय पिडीत मुलास दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असून त्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे.
– अब्दुल खादीर गिलानी, पोलीस निरीक्षक, छत्रीनाका

दरम्यान सोशल मिडीयावर हा व्हिडियो व्हायरल होत आहे त्यामुळे अनेक जण यावर तीव्र संताप व्यक्त करून या व्यक्तीस अटक करण्याची मागणी करीत होते  


काय आहे हा विडीयो बघा ( टीप : व्हिडियो मधील दृश्ये आपल्याला विचलित करू शकतात )



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने