📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

देवळा तालुका मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध

देवळा दि.२७ | प्रशांत गिरासे

देवळा तालुका मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांचे प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह देवळा येथे आज (दि.२७) पार पडली.
एकूण १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत.त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली, यावेळी जिल्हा समन्वयक बाजीराव खैरनार उपस्थित होते. यशवंत पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
नूतन कार्यकारिणी सदस्य
तालुकाध्यक्ष: वैभव पवार,
कार्याध्यक्ष: विशाल पाटील,
उपाध्यक्ष: भगवान देवरे,दादाजी हिरे व महादेव मोरे,
सरचिटणीस: जगदीश निकम,
सहसरचिटणीस: कुणाल शिरसाठ ,
खजिनदार: सुभाष चव्हाण,
सहखजिनदार: आदिनाथ सूर्यवंशी,
संघटक: प्रविण आहेर,
सहसंघटक: सुभाषबिरारी,
समन्वयक: संदीप देवरे,
कार्यकारिणी सदस्य: एकनाथ सावळा,निलेशजाधव, सोपान सोनवणे,मनोज वैद्य, विष्णू जाधव,सौ.संगीता पगार-रौंदळ आदी.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सदस्य यांनी पत्रकार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
नवनिर्वाचित पदाधिकारींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने