नाशिक (रुपेश जगताप) देवळा तालुक्यातील उमराणे गावाजवळ आज दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिकहून धुळे कडे जाणारी एशियाड बस क्र. एम एच 14 बीटी 5066 या बसवर अज्ञात समाजकंटकांकडून दगडफेक करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे, या हल्ल्यामुळे बस चालक सुरेश सोळंके जखमी झाले आहेत, बसवर दोन वेळा हल्ला हल्ला करून बसच्या काचा फोडण्यात आल्या, या वेळी बसमध्ये 22 प्रवासी प्रवास करत होते, परंतु सुदैवाने एकही प्रवासी जखमी झाला नाही.
दरम्यान विलीनीकरणासाठी ठाम असलेल्या काही संघटनांकडून अजूनही काम बंद आंदोलन सुरू आहे.
सरकारने गंभीर इशारा दिल्यामुळे काही कर्मचारी कामावर हजर झालेत, त्यामुळे संपामध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसल्यामुळे हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारकडून विलीनीकरणासाठी कुठल्याही प्रकारचे आश्वासन मिळत नसल्याने केवळ पगारवाढीसाठी आमचा संप नव्हताच असा पवित्रा कर्मचारी संघटनांनी घेतला होता, त्यानुसार अजूनही काही ठिकाणी संप सुरूच असल्याची माहिती मिळत आहे.
परंतु अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे प्रवाशांची सुरक्षितता हे प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहेत त्याबरोबरच चालक व वाहक यांची ही सुरक्षितता महत्त्वाचे आहे.
सदर हल्ल्याच्या अनुषंगाने चालक व वाहक यांनी पोलिसात तक्रार दिली आहे , पोलीस पुढील तपास करीत आहेत
Tags
msrtc