📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगावात सिनेमागृहात टवाळखोरांचा उन्माद; छावणी पोलिसात गुन्हा दाखल

मालेगाव शहर म्हटले की बेशिस्तपणा आणि कायदे मोडण्याचे जणू लायसन्स मिळाले आहे अशा अविर्भावात अनेक मंडळी वावरत असतात, कुठल्या ना कुठल्या कारणावरून मालेगाव सतत चर्चेत राहतात परंतु चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टीच मालेगावकरांना मालेगाव नाव 'रोशन' करण्यात मजा येत असल्याचे कालच्या घटनेवरून जाणवतं

याबाबत सविस्तर वृत्त असे की मालेगाव येथील सुभाष चित्रपटगृहात सलमान खानचा अंतिम नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे यावेळी शुक्रवारी रात्री नऊच्या शो दरम्यान सलमान खानच्या काही चाहत्यांनी सिनेमागृहातच फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्याचा प्रयत्न केला यामुळे इतर प्रेक्षकांमध्ये धावपळ उडाली व फटाक्यांचे धुरामुळे चित्रपटगृहात धुमाकूळ माजला होता.

सलमान खानच्या अतिउत्साही तसेच वात्रट प्रेक्षकांना मुळे इतर प्रेक्षकांचे मोठे हाल झाले धावपळ झाल्याने अनेकांच्या पायाला खुर्च्या लागल्या तर धावपळीत धक्काबुक्की झाल्यामुळे अनेकांना मुका मार लागला आहे, याबाबत छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

यापूर्वीही अनेकदा अनेक थिएटर्समध्ये अशा घटना घडलेल्या आहेत वास्तविक यामध्ये सिनेमागृह चालकांची ही चुकी आहे कुठलाही प्रेक्षकांची तपासणी केल्याशिवाय त्यांना आत मध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केल्यास पुन्हा अशा घटना होणार नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने