📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

ब-सत्ता प्रकार मिळकतीचा धारणाप्रकार बदलण्याबाबत कोणतीही अडचण नाही: अपर जिल्हाधिकारी निकम

नागरिकांनी नगर भूमापन कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावेत

मालेगाव, दि. 7 (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा): निवासी, वाणिज्यीक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग-2 धारणाधिकारावर किंवा भाडेपट्याने प्रदान केलेल्या किंवा प्रदानानंतर असा वापर अनुज्ञेय करण्यात आलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-2 मध्ये रुपांतरण करण्याकरीता देय रुपांतरण अधिमुल्य रक्कम निश्चीत केलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग याचेकडील 15 मार्च 2021 च्या परिपत्रकान्वये ब-सत्ता प्रकार अथवा अन्य कोणताही सत्ताप्रकार म्हणून नोंदविलेल्या आणि निवासी, कृषिक, वाणिज्यीक, औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-1 या धारणाधिकारामध्ये रुपांतर करण्याबाबत मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. ब-सत्ता प्रकार मिळकतीचा धारणाप्रकार बदलण्याबाबत कोणतीही अडचण नसून नागरिकांनी नगर भूमापन कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या मालेगाव, देवळा, बागलाण, चांदवड, कळवण व नांदगाव तालुक्यातील नगर भूमापन मिळकती 8 मार्च 2019 च्या शासन अधिसूचनेनुसार भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणेबाबत तसेच ‘ब’ सत्ता प्रकारच्या मिळकतींचा धारणा प्रकार वर्ग-1 करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत सर्व संबंधित नगर भूमापन अधिकारी, उप अधिक्षक भूमी अभिलेख यांना कार्यपध्दती ठरवून देण्यात आलेली आहे. तशा सुचना संबंधित अर्जदारांचे प्रस्ताव संबंधित भूमि अभिलेख कार्यालयात जमा करण्याबाबत देण्यात आलेल्या आहेत. सदरचे प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रांच्या पूर्तताअंती संबधित अर्जदार यांचेकडून नजराणा रक्कम भरणा करुन घेतल्यानंतर या कार्यालयामार्फत आदेश पारीत केला जातो. ‘ब’ सत्ता प्रकार मिळकतींचा धारणाप्रकार बदलण्याबाबत कोणतीही अडचण नाही. नागरिकांनी नगर भूमापन कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावेत असे आवाहन अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी केले आहे.

ब-सत्ता प्रकारच्या मिळती संदर्भात प्रसिध्द झालेल्या बातम्यांमुळे जनसामान्यात चुकीचा संदेश जाऊन संभ्रम निर्माण होत आहे. अपर जिल्हाधिकारी यांचेकडील आदेशाचा मिळकत पत्रिकेवर अंमल घेण्यासाठी भूमि अभिलेख कार्यालयाच्या संगणकीय प्रणालीमध्ये अडचणी निर्माण होत असल्या तरी त्या लवकरच दूर करण्यात येतील.

महाराष्ट्र शासन राजपत्र 8 मार्च 20219 नुसार ब-सत्ता प्रकारच्या मिळती भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणे बाबतची कार्यवाही या कार्यालयामार्फत सुरु असून प्रस्तुत विषया संदर्भात जनतेस काही अडचणी आल्यास त्यांनी संबंधित भूमिअभिलेख किंवा अपर जिल्हाधिकारी मालेगाव कार्यालयाशी संपर्क साधावा असेही अपर जिल्हाधिकारी श्री. निकम यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने