पत्रकार: प्रशांत गिरासे -वासोळ
लोहोणेर-: येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर व जनता विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय. यु. बैरागी व पर्यवेक्षक बी.के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनवच्या शिक्षक वृदांनी दिंडीचे नियोजन केले.सदर पायी दिंडीची सुरुवात विद्यालयापासून करण्यात आली.सदर दिंडीत अभिनवच्या बालगोपाळांनी विठुराया,रुक्मिणी आणि वारकरी अशा विविध वेशभूषा साकारत विठूमाऊलीचा गजर करत आपल्या चिमुरड्या पावलांनी वाजत गाजत दिंडीत सहभाग घेतला.यावेळी विद्यार्थी शिक्षक यांनी रिंगण करत फुगडी सादर केली. सदर दिंडी यशस्वी करण्यासाठी अभिनव बालविकास मंदिराचे शिक्षक आर.एस.पवार,एस.एस.