📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

लोकनेते लालजी पाटील स्कूल मध्ये बाळ गोपाळ यांनी केली आषाढी एकादशी साजरी.


निंबोळा ता.देवळा येथील विद्या प्रसारक समिती निंबोळा संचलित लोकनेते लालजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये अध्यक्ष मा.दिलीप अण्णा पाटील व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गणेश आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाने आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. 
यावेळी विठ्ठल-रखुमाई वारकऱ्यांच्या वेशात आलेले विद्यार्थी हे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होते,तसेच इतर विद्यार्थी हरिनामाच्या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते,
हिंदू धर्मात सर्वाधिक महत्वपूर्ण आशा आषाढी एकादशी उत्सव साजरा केला, कारण विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राची रूढी- परंपरा, सुसंस्कार व विविध सणांचे महत्व रुजविण्यासाठी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात,
शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनवणे सर यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई चे पूजन कऱण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.हर्षाली मोरे यांनी केले, प्रा.मयूर अहिरे, प्रा.प्रशांत बच्छाव, प्रा.सायली अहिरे, प्रा.दीपाली देवरे आदींसह शिक्षक- शिक्षिका व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रांजली पवार यांनी केले तर आभार प्रा.आरती सोनवणे यांनी केले.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने