📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

सतत सुरू असलेल्या पावसामुळे गिरणा नदीला पूर



राकेश आहेर (देवळा) 

   गेल्या दोन - तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने नद्या - नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे कळवण तालुक्यातील चणकापुर धरणातुन आज सकाळी ११.३० वाजता १८५३९ क्युसेक , तर  पुणद धरणातुन २४४२ क्युसेक ईतका पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू असुन देवळा तालुक्यातील सावकी - विठेवाडी गावादरम्यान असणारा गिरणा नदितीरावरील पुल पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर कायम सुरू राहिल्यास चणकापुर व पुनद धरणाच्या पाणलोटात वाढ होऊन २५००० क्युसेक पर्यंत पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास लोहणेर - ठेंगोडा दरम्यान असलेल्या गिरणा पुलाला, तसेच निंबोळा येथिल पुलालाही पाणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे  प्रशासनाने गिरणानदी काठावरील गांवाना सावधानतेचा इशारा दिला असून कुठल्याही पुलावरून पाणी वाहत असल्यास  नागरिकांनी वाहतुकीसाठी पुलाचा वापर करू नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.


नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क रहावे; नदीकाठावर पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये : जिल्हाधिकारी गंगाथरन डी.


जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये मोठ्याप्रमाणावर पाऊस झाला असून काही भागात अतिवृष्टीही झाली आहे. अगामी चार दिवसात जिल्ह्यात अतिप्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने धरण प्रकल्पातून विसर्गही सुरू असून प्रसंगी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्क रहावे, तसेच नदीकाठावर पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष गंगाथरन डी. यांनी केले आहे.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या मार्फत आलेल्या व्हाट्सअॅप संदेशानुसार गेल्या तीन ते चार दिवसात झालेला मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे तसेच भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस मुसधार पावसासोबत अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाची तीव्रता वाढल्यास धारणांमधील विसर्गाचे प्रमाणही वाढविण्यात येईल. त्यामुळे नदीकाठावरिल नागरिकांनी सतर्क रहावे, तसेच नदीकाठी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने