📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

जे ए टी महिला महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे फ्रेशर्स डे साजरा

( मालेगाव )मालेगाव येथील जे ए टी आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये इंग्रजी विभागातर्फे  प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी फ्रेशर्स डे चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या शैक्षणिक समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयात वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांनी महाविद्यालयात असलेल्या सोयी सुविधांबाबत माहिती दिली. प्राचार्य डॉ. अन्सारी यांनी विद्यार्थिनींचे स्वागत केले आणि पुढील शैक्षणिक जीवनासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व विद्यार्थिनीचे  स्वागत गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन करण्यात आले. याप्रसंगी इंग्रजी विभागाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचे स्वागत केले. या कार्यक्रमाला डॉ. फॅमिदा अन्सारी, डॉ. लोधी कनीझ फातिमा यांच्यासह बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रा.मुनव्वर  अहमद यांनी उपस्थितांचे यांचे आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने