📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

के. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण तसेच वक्तृत्व स्पर्धा संपन्न


      लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्राणवायू निर्माण करणारी वृक्ष लावून पर्यावरणाचे संवर्धन करणे व सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने हा उपक्रम संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे व विश्वस्त संपदा हिरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रवीण पाटील होते. उपप्राचार्य रवींद्र शिरूडे , उपप्राचार्य राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक नितीन गवळी पर्यवेक्षक संजय शिंदे, पर्यवेक्षक सुभाष निकम,प्राध्यापिका सौ.शितल शिंदे, कार्यालयीन प्रमुख संजय सूर्यवंशी, जितेंद्र विसपुते, ज्येष्ठ शिक्षक आर. बी. बच्छाव व्यासपीठावर उपस्थित होते.
     व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
         शिक्षक प्रतिनिधी म्हणून जेष्ठ शिक्षक आर.बी. बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रवीण पाटील यांनी लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या कार्याची माहिती विशद करून विनम्र अभिवादन केले.
       सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. आभार राजेश धनवट यांनी मानले.वकृत्व स्पर्धेत वेदांत सोनवणे (प्रथम क्रमांक ), अर्जुन कचवे (द्वितीय क्रमांक) खंडेराव भामरे (तृतीय क्रमांक), साईराज अहिरे उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील सूर्यवंशी, हेमंत पगारे,शशिकांत पवार, जे. टी. ठाकरे,जयदीप शेवाळे,हरित सेनेचे बी. पी. सोनवणे, टी.यू. देवरे, के. वाय. देवरे, एस. आर. नेरकर तसेच शिक्षकेतर बंधू यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर बंधू व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने