📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

पुरोगामी पत्रकार संघ संचलीत पोलीस मित्र संघटनेच्या नामपुर विभाग अध्यक्ष पदी सुनील निकुंभ यांची नियुक्ती

आज दि.29 जून रोजी मालेगाव येथील शासकीय रेस्ट हाऊस येथे पुरोगामी पत्रकार संघ आयोजित बैठकीत पुरोगामी पत्रकार संघ संचलीत पोलीस मित्र संघटना नामपूर विभाग अध्यक्ष पदी नामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते,पोलीस मित्र सुनिल भाऊ निकुंभ यांची नियुक्ती करण्यात आली.सदर नियुक्ती ही पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल व नाशिक जिल्हा अध्यक्ष संतोष तात्या जाधव यांच्या आदेशानव्ये तथा पुरोगामी पत्रकार संघ संचलित पोलीस मित्र संघटनेचे राज्याध्यक्ष आनंद भाऊ दाणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष तात्या जाधव यांनी पुरोगामी पत्रकार संघाचे ध्येय आणि धोरणे याबद्दल विस्तृत माहिती दिली .सदर नियुक्ती बैठकी प्रसंगी कल्याणी ताई धोंडगे, ज्ञानेश्वर सोनार, करुणा ताई पाटिल, दामिनी ताई पाटिल आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने