📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

के. बी. एच. विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन

   के. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाचे जनक , थोर समाज सुधारक व समतेचे पुरस्कर्ते लोक कल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रवीण पाटील होते .यावेळी उपप्राचार्य राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक नितीन गवळी सांस्कृतिक विभागाचे राजेंद्र शेवाळे,राजेश धनवट ,बाबाजी बोरसे व्यासपीठावर उपस्थित होते.
       व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
       कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रवीण पाटील यांनी सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्यायाचे प्रणेते, शेतकऱ्यांचे कैवारी, आरक्षणाचे जनक, सत्यशोधक चळवळीला बळ देणारे आणि शिक्षणाची गंगा सर्वसामान्य पर्यंत पोहोचवणारे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती विशद करून आदरांजली अर्पण केली.
       सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेंद्र शेवाळे यांनी केले .आभार राजेश धनवट यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने