जिल्ह्यात ( ग्रामीण )आजपासून दुपारी 3 ते पहाटे 6 पर्यंत कलम 144 लागू, नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरता येणार नाही!
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज हे आदेश निर्गमित केले
कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपात्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून राज्य शासनाने आदेश निर्गमित केलेले असुन तद्अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक यांनी उपरोक्त आदेशान्वये नाशिक जिल्हयामध्ये दिनांक 01/06/2021 रोजीचे सकाळी 07.00 पासुन ते दिनांक 15/06/2021 रोजीचे सकाळी 07.00 या कालावधीकरिता निर्बंध लागू केलेले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक परिस्थिती निर्माण होवू नये, याकरिता तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे आणि अशी उपाययोजना फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 मधील तरतुदींच्या अनुषंगाने जनतेस, संबंधित आस्थापना यांना उद्देशून काढणे आवश्यक आहे. आणि, नाशिक (ग्रामीण) जिल्हयात कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून नाशिक (ग्रामीण) जिल्हयात दिनांक 01/06/2021 ते दिनांक 15/06/2021 रोजीपावेतो फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 कलम 144 (1) (3) अन्वये खालीलप्रमाणे आदेश लागू करीत आहे.
1. नाशिक (ग्रामीण) जिल्हयात दिनांक 01/06/2021 ते दिनांक 15/06/2021 या कालावधीत दररोज दुपारी 03.00 ते सकाळी 06.00 वाजेपावेतो नागरीकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई असेल. अत्यावश्यक व अनुज्ञेय बार्बीशी निगडीत व्यक्तींनी बाहेर पडताना फोटो ओळखपत्र तसेच बाहेर पडण्याचे अनुज्ञेय बार्बीसंदर्भातील सबळ पुरावादर्शक कागदपत्रे जवळ बाळगणे अनिवार्य राहील.
2. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक यांचेकडील आदेश क्र. कक्ष/कोरोना विषाणू / 423/2021, दिनांक 31/05/2021 अन्वये विहीत केलेल्या वेळेत सूट दिलेल्या आस्थापना / सेवा वगळून इतर सर्व आस्थापना / सेवा या उक्त नमूद कालावधीत बंद राहतील. तसेच सर्व आस्थापनांना (खाजगी / शासकीय) उक्त वाचले क्र. 21 वरील आदेशात नमूद केलेल्या तरतुदींचे पालन करणे बंधनकारक राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा समुह हे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच भारतीय दंड विधानचे कलम 188 तसेच इतर प्रचलीत कायद्यातील तरतुद नुसार शिक्षेस पात्र राहतील.