📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

टीईटी सर्टिफिकेट आता 'लाईफटाईम' वैध

शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची (TET Certificate) मर्यादा आता आजन्म करण्यात आली आहे. त्यामुळे याचा फायदा शिक्षकी पेशा निवडणाऱ्या उमेदवारांना होणार आहे. या अगोदर या प्रमाणपत्राची वैधता 7 वर्षासाठी होती. या कालावधीत जर उमेदवाराला नोकरी लागली नाही तर पुन्हा परीक्षा द्यावी लागत होते. त्यामुळे आता या निर्णयामुळे इच्छुक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी प्रमाणपत्राची वैधता आजन्म केल्याची घोषणा केली आहे. 

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नवे प्रमाणपात्र देण्याचे आदेश देण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच 2011 या वर्षानंतर ज्या उमेदवाराचे शिक्षण पात्रता प्रमाणपत्र समाप्त झाले आहे त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने