📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

अखेर बारावीची ही परीक्षा रद्द!

covid-19 महामारी च्या  वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा (HSC EXAM) रद्द करण्याचा निर्णय अखेर जाहीर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत १२ वीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं आहे.
काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यानी यापूर्वीच म्हंटल होत की “बारावीच्या परीक्षांसदर्भातील परिस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडली आहे. आमचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक दोन दिवसांमध्ये होईल. त्यानंतर त्यांची परवानगी आली की आम्ही परीक्षेबाबत निर्णय जाहीर करू
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. सीबीएसई, आयसीएसई, हरयाणा आणि गुजरात सरकारनं देखील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने