मालेगाव (मनोहर शेवाळे) सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कॉलेज स्टॉप येथील चौकात प्रस्तावित आहे.
तमाम मालेगावकरांच्या आस्थेचा विषय असलेल्या ह्या पूर्णाकृती पुतळ्याचा विषय उपमहापौर निलेश आहेर यांनी आज पार पडलेल्या मालेगाव महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत विषय पत्रिकेवर घेतला होता.
यामध्ये त्यांनी महासभेला या विषयाचे महत्त्व पटवून सांगितले, त्यावर समिती गठीत करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले त्यामुळे हा विषय तूर्तास लांबणीवर पडला आहे, परंतु कॉलेज स्टॉप चौकाला छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे, यापुढे हा चौक छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणून ओळखला जाईल, व पूर्णाकृती पुतळ्याच्या निर्मितीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीद्वारे पुढील बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
चौकाला छत्रपती संभाजी महाराज चौक असे नाव