मालेगाव (मनोहर शेवाळे ) कोरोनाच्या ओमिक्रॉन (omicron) या नव्या व्हेरिएंटने जगभरात दहशत माजवली आहे ओमीक्रोनचा वाढता धोका आणि कमी झालेले लसीकरणमुळे मालेगाव मनपाची उद्या पासून सुरू होणाऱ्या शाळा आल्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत , इयत्ता १ ली ते ७ वीच्या शाळा दि. १ डिसेंबर २०२१ पासून सुरु करणे प्रस्तावित होते. परंतु मालेगावातील शिक्षक व शैक्षणिक कर्मचाऱ्यांचा लसीकरणाचा असलेलें अनुशेष भरून निघेपर्यंत शाळा सुरु करणे धोक्याचे ठरू शकते त्यामुळे शाळा कधी पासून सुरू करायच्या या बाबत मनपाच्या सर्व साधारण सभेत निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिली.
शिक्षकांच्या लसीकरण संदर्भात देखील होणार चर्चा
मनपा च्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत चर्चा करण्यात येणार असून शाळा कधी पासून सुरू करायच्या बाबत मनपाचा सर्व साधारण सभेत निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिली
१ डिसेंबरपासून शाळा सुरु होणार असल्याच्या वृत्तामुळे शहरातील पालकांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. आपल्या लेकरांना शाळेत पाठवल्यावर कोरोनाची लागण होऊ शकते का, अशी चिंता पालकांना सतावत होती. त्यातच मागील चार दिवसात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट उभे राहिल्याने या चिंतेत अधिकच भर पडली.
शाळा चालू करण्याबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना -जाणून घ्या काय आहे नियम ?
आरोग्य विभागाच्या आरोग्यसेवा संचालनालयाकडून शाळा सुरू करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
⏱️ येणाऱ्या १ तारखेपासून पासून राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जिल्हापरिषद, महापालिका स्तरावर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या या सूचनांचा विचार शिक्षण विभाग करणार आहे, त्यानंतर याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे
👀 पहा काय आहेत नियम ?
⬅️➡️ दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फूट अंतर ठेवावे लागणार.
😷 शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांनी मास्क घालणे बंधनकारक आहे.
🙌🏻 वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी.
💉 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
🙅🏻♂️ शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितीच्या पद्धतीचा अवलंब करू नये.
🙅🏻♂️ शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळावी.
🤧🤒🙅🏻♂️ ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी.
❌ मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांना शाळेत येण्यास बंदी.
✅ क्वॉरंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी.