📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मालेगावच्या पावणेतीन वर्षाचा चिमुकलीने सर केले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर

मालेगावच्या चिमुकलीने सर केले कळसुबाई शिखर... पावणे तीन वर्षांच्या हिरकाणीचा अनोखा विक्रम, मालेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा
 
मालेगाव (मनोहर शेवाळे )वय अवघे दोन वर्ष दहा महिने.. आईवडिलांना गिर्यारोहणाचा प्रचंड आवड.. तेच बाळकडू जन्माला घेऊन आलेल्या मालेगावच्या या इवल्याशा लेकीने विक्रम साकारला... महाराष्ट्राचे 'एव्हरेस्ट' असा लौकिक असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतराजीतले सर्वात उंच कळसुबाईचे शिखर तिनं गाठलं... तेही अवघ्या साडेचार तासात... ही स्वप्नवत परीकथा सत्यात उतरवली 'हिरकणी' या लेकीने ... हिरकणी पुष्पक निकम या चिमुकलीच्या पराक्रमाने मालेगावच्या शिरपेचात मनाचा नवा तुरा रोवला गेला आहे. मालेगाव शहरातील का. र. शहा विद्यालयाचे उपशिक्षक पुष्कर निकम यांनी अध्यापनासह गिर्यारोहणाची आवड जोपासली आहे. राज्यातील विविध गडकिल्ले व ऐतिहासिक पर्यटक स्थळांना भेट देऊन ऐतिहासिक संदर्भ अभ्यासणे व इतिहासप्रेमींना व विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती सांगणे हा अनोखा छंद जपला आहे. पुष्पक निकम यांच्या छंदाला पत्नी धनश्री निकम यांनी भक्कम साथ मिळाली आणि राज्यभर गडकिल्ले सर करण्याच्या वेगवेगळ्या मोहिमा या दाम्पत्याने आखत पार केल्या. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लेकीनेही अनुकरण केलं. तोल सांभाळण्याची अभिजात कला गवसलेल्या हिरकणीला गड किल्ले सर करतांनाचे नियम ती लक्षात ठेवून सहजपणे पालन करते. ही कलाच तिला गवसली आहे. दीड वर्षाची असतांना तीला पहिल्यांदा किल्ला तिळवण (ता. बागलाण) येथील चौल्हेर किल्याची सैर घडवली आणि गड किल्ले हिरकणीला आकर्षित करू लागले. लॉकडाऊन खुले होताच लेकीने गडकिल्ले सर करण्याचा हट्ट केला. अगदी कमी कालावधीत उत्तर महाराष्ट्रात लहान डोंगर व गड चढण्याचा सपाटा लावला. गंगासागर डोंगर (पिंपळगाव दाभाडी); अंकाई किल्ला मनमाड (ता नांदगाव) रामशेज किल्ला (नाशिक) कन्नड घाटातील अंतूर किल्ला (जि. जळगाव); अशी डोंगर टेकडीवर भ्रमंती सुरू झाली. चढ-उतार करताना पाळावयाचे नियम हिरकणी काटेकोरपणे पालन करते. प्रारंभी आई वडिलांची मदत घेणारी ही चिमुकली आता निष्णात गिर्यारोहकाप्रमाणे गड किल्ले सर करत असल्याने निकम दाम्पत्याने कळसूबाई शिखर पार करण्याचा संकल्प केला. सहकुटुंब व हौशी गिर्यारोहक सोबतीला घेऊन ५४००० फूट उंच असलेले कळसुबाई पर्वत शिखराकडे हिरकणीने पहाटे पाच वाजता चढाईला सुरुवात केली. शिखराकडे जाताना वाटेत असणाऱ्या भल्यामोठ्या चार लोखंडी शिड्या व कातळ चढाई लीलया पार केली. शिवरायांचा जयघोष हा तिचा प्रवासातील आवडीचा स्वर.. इवल्याशा लेकीचा उत्साह अन्य गिर्यारोहकांना प्रेरणा देऊन जात असल्याने ही मोहीम साडे चार तासात हिरकणीने फत्ते केली. हिरकणीच्या सुरक्षेसह आहाराची काळीज घ्यायचा आई वडील आणि नातलग सावलीसारखे सोबतीला होतेच. अखेर अथक प्रयत्नाने हिरकणीने कळसुबाई शिखरावरील मंदिरात देवीचे दर्शन घेऊन तिची चढाई पूर्ण केली. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दाभाडी येथील विक्रम निकम व निवृत्त शिक्षिका पुष्पा पवार निकम यांची ही नात असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  हिरकणीला गड किल्ल्यांचे प्रचंड आकर्षण आहे. तिचा बालहट्टच गड किल्ले सर करण्याचा असतो. या हौसेला आम्ही उभयतांनी बळ देण्याचा प्रयत्न करतोय. गिर्यारोहणाच्या नियमांचं पालन सहजपणे करते. पुष्पक निकम, (हिरकणीने वडील) उपशिक्षक, का. र. शहा विद्यालय, संगमेश्वर, मालेगाव

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने