🛑तब्बल दहा शिक्षकांनावर झाली निलंबनाची कारवाई..
🛑 *व्हॅकशीनेशन न देता दिले प्रमाणपत्र...*
🛑 व्हॅक्सिन्स शिल्लक राहिल्याने प्रकार झाला उघड...
🛑प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिपोर्ट नंतर शिक्षण मंडळ प्रशासन अधिकाऱ्यांनी निलंबनाची प्रस्ताव आयुक्तांना सादर केला...
🛑आयुक्तांच्या आदेशानंतर निलंबनाच्या कारवाईला सुरवात...
मालेगाव (मनोहर शेवाळे) शहरातील कोरोना निर्मूलन कामासाठी नेमणूक करण्यात आलेल्या कोविड व्हॅकशीनेशन च्या संगमेश्वरवार्ड च्या मोहिमेदरम्यान कोविन अँपवर ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे काम सोपविण्यात आले असता १३ लाभार्थ्यांना लसीकरण न करता रजिस्ट्रेशन करण्यात आल्याचा आरोप झाला,
व्हॅक्सिन वापरात तफावत पडल्याने वायल शिल्लक राहिले व चुकीचा रिपोर्ट दिल्याचे आरोप आरोग्य अधिकारी यांनी ठेवलेत त्या आधारे राष्ट्रीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोपही त्या शिक्षकांवर ठेवण्यात आला आहे.
मनपाच्या गुरुजनांनीच केले खोटे लसीकरण
लसीकरनाला विरोध करणाऱ्या मालेगाव शहरात शिक्षकांनीच लसीकरण मोहीमेला कलंक लावल्याचे मालेगाव शहरात उघड झाले आहे. यामुळे मनपाच्या 10 शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेने राज्यभरात खळबळ उडवली आहे. मालेगावात सुरुवातीपासून कोरोना संसर्ग आजाराला न मानणारा मोठा जनसमुदाय मध्य भागात आहे. आतापर्यंत केवळ 10 टके नागरिकांचे लसीकरण येथे पूर्ण झाले आहे. शासनाने मनपाच्या ज्या गुरुजनांवर लसीकरण मोहिमेची जबाबदारी सोपवली आहे त्यांनीच यात जुलै महिन्यात घोटाळा केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. व्हॅक्सिनेशन न करता प्रमाणपत्र दिल्याची बाब सर्वे दरम्यान समोर आल्याने वैद्यकीय विभागाच्या तक्रारी वरून प्रशासन अधिकारी यांनी ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव मध्य भागात कोरोना लसीकरण मोहिमेबाबत मोठ्याप्रमाणात समज गैरसमज पसरले आहेत. त्यामुळे या शहरात आधीपासूनच लसीकरनाला नागरिकांनी अल्प प्रतिसाद दिला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगाव शहर कोरोना चे हॉटस्पॉट बनले होते. राज्य शासनाने स्वतंत्र अधिकाऱ्याची फौज उभी करून मालेगाव शहरात कोरोना रोखण्याचे काम केले. याचेच फलित म्हणून मालेगाव कोरोना मुक्तीच्या दिशेने पुढे आले. कामगार वस्ती असलेल्या या शहरात कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी दिसून आला. त्यामुळे लसीकरनाला वेगाने सुरुवात करण्यात आली खरी.
मात्र मध्य भागातील जनतेला लसीकरण नको होते, येथिल लसीकरण वेग वाढवण्यासाठी अनेकदा धर्मगुरू यांच्या बैठक घेण्यात आल्या. लोकप्रतिनिधी शी चर्चा झाल्या. त्यानुसार मंदीर, मस्जिद मधून लसीकरनाची जनजागृती करण्यात आली.
मात्र या शिक्षकांनी जनजागृती तर सोडाच चक्क लसीकरण न करता थेट प्रमाणपत्र वाटप केल्याचे उघड झाले आहे. येथील काही शिक्षकांवर संगमेश्वर भागात कोविन अँप वर नागरिकांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याचे काम सोपविण्यात आले होते. 2 जुलै 2021 येथील 13 नागरिकांचे लसीकरण न करता त्यांना प्रमाणपत्र दिले गेले. वायल शिल्लक असल्याने ही बाब वैद्यकीय अधिकारी यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांच्या तक्रारी नुसार 11 शिक्षकांवर राष्ट्रीय कामात दिरंगाई केल्याप्रकरणी सोमवारी ( दि.11) मालेगाव मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी निलंबनाची कारवाई केली. या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवली आहे.
मध्य भागात अजूनही असे प्रकार घडल्याचे दाट शक्यता आहे, या दृष्टीनेही तपास करणे गरजेचे आहे, शासनाच्याच कर्मचाऱ्यांनी शासनाची ही केलेली फसवणूक अत्यंत गंभीर आहे.
या प्रकरणाने मालेगावात 'हम करे सो कायदा' अशा प्रकारची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे का या गोष्टीचा शोध घेणे आणि प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे
पोलिओ लसीकरनाबाबत देखील मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात उदासीनता आहे. याबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते, धर्मगुरू प्रार्थना स्थळातून जनजागृती करता पण मध्य भागातून लसीकरनासाठी गेलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी नकार घंटा एकवली जाते. आता कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आले असतांना कर्मचाऱ्यांचा यात गलथान कारभार समोर आला आहे.