नवी दिल्ली (इशिका पगारे ) कोरोनाव्हायरस पसरवणाऱ्या SARS-CoV-2 विषाणूच्या जीनोम सिक्वेसींगच्या एका वर्षाच्या आत शास्त्रज्ञांनी कोविड 19 लस (Covid: 19 Vaccines) तयार केली. त्याच काळात त्याची चाचणी झाली आणि ती लोकांद्वारे वापरली जाऊ लागली. यामुळे लोकांना पूर्णपणे लसीकरण (Corona Vaccination) करून कोरोना संसर्गापासून रोखले जाण्याची शक्यता निर्माण झाली. जास्त उत्पन्न असलेल्या देशांनी 2021 च्या सुरुवातीलाच लोकांना कोरोना लस देणे सुरू केले. ज्यांचे पूर्णपणे लसीकरण झाले होते त्यांच्यामध्ये पुन्हा संसर्ग पसरू लागला, तेव्हा ही गोष्टही निरुपयोगी ठरली. कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएन्ट देखील लसीकरण केलेल्या लोकांना पकडू लागले आणि यामुळे चिंता आणखीनच वाढली. आता असे अनेक देश आहेत, जे कोरोना लसीचा अतिरिक्त डोस देण्याची तयारी करत आहेत. याला बूस्टर डोस असे म्हटले जात आहे.
मात्र, काही लोक याला यूस्टर डोस म्हणण्यास आक्षेप घेत आहेत. ते म्हणतात की, " कोरोना लसीचा पहिला डोस प्राथमिक आहे. दुसरा डोस आधीच बूस्टर डोस आहे. सध्या जास्त उत्पन्न असलेले देश इस्त्रायलने बूस्टर डोसकडे वाटचाल केल्यानंतर कोरोना लसीच्या अतिरिक्त होससाठी पुढे जात आहेत.
हे अतिरिक्त बूस्टर डोस अधिक चांगले आणि दीर्घकाळ टिकणारे फायदे देऊ शकतात का? तसे असल्यास, संपूर्ण लोकसंख्येला त्याची आवश्यकता असेल का? यामुळे सुरक्षेची चिंता वाढेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप उपलब्ध नाहीत, कारण बूस्टर डोस लागू करण्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे.