*: उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शर्मा*
*मालेगाव, दि. 13 ( मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा)*: अवैधरित्या विनापरवाना हातभट्टीसह देशी दारु विकुन त्यावर उदरनिर्वाह करण्याबरोबर नागरिकांना अरेरावी करुन दहशत माजविणाऱ्या सात इसमांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहर व तालुका परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये प्रवेश बंदी घालण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विजयानंद शर्मा यांनी पारित केले आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गाव परिसरात सार्जनिक शांतता भंग होऊ नये, सण उत्सव काळात गैरकृत्यापासून दूर रहावे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार दत्तु पोपट खैरनार, बंडु महादू गांगुर्डे, सचिन शालींदर जाधव, नबाबाई छबू माळी राहणार रोकडोबा नगर दाभाडी, नबाबाई साहेबराव पवार, आदिवासी वस्ती, टेहरे, विजय छबू जाधव, इंदिरा नगर, टेहरे, करण उर्फ कुणाल राजेंद्र गायकवाड नवनाथ नगर, संगमेशवर, यांचे विरुध्द विना परवाना गावडी हातभट्टीची दारु विकून त्यावर उदर निर्वाह करणे व परिसरातील नागरिकांना अरेरावी करुन दहशत निर्माण करणे आदि गुन्ह्यामध्ये अटक करुन त्याचे विरुध कोर्टात खटले भरण्यात आले आहेत. वरील सातही इसमांविरुध्द विविध पोलीस ठाण्यांमध्ये कलम 65 (ई), 65 (ख) (ड) 65 (ई) 66, 65 (फ) (क) अन्वये गुन्हे दाखल आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार वरील सातही इसमांना मालेगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विजयानंद शर्मा यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
मालेगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये दत्तु पोपट खैरनार, बंडू महादू गांगूर्डे यांना प्रवेशबंदीचे आदेश निर्गमित केल्यापासून 20 सप्टेंबर 2021 पर्यंत, सचिन शालींदर जाधव, नबाबाई छबू माळी, नबाबाई साहेबराव पवार, विजय छबु जावध यांना प्रवेशबंदी आदेश निर्गमित केल्यापासून 21 सप्टेंबर, 2021 तर करण उर्फ कुणाल राजेंद्र गायकवाड यांना 19 सप्टेंबर 2021 पर्यंत मालेगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात आल्याचेही शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
*00000*