📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

दुर्दैवी: विहीरीत पडल्यामुळे खोदकाम करणाऱ्या मजुराचा मृत्यू

ज्ञानेश्वर आढाव (वार्ताहर)

 देवळा विहीरीत पडल्यामुळे खोदकाम करणाऱ्या मजुराचा मृत्यू

लोहोणेर(ता.देवळा) येथील प्रकाश शंकर सोनवणे यांच्या मालकीच्या नवीन विहिरीचे खोदकाम चालू असताना विहिरीत उतरण्यासाठी क्रेनला बांधलेला वायरलुप अचानक तुटल्याने एका इसमाचा मृत्यू झाला आहे. 
   याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोहोणेर येथे प्रकाश सोनवणे यांच्या विहिरीचे काम खालप(ता.देवळा) येथील समाधान पगारे या ठेकेदाराने घेतले आहे, आज रात्री नेहमी प्रमाणे विहिरीचे काम चालू असताना क्रेनचा वायरलुप तुटल्याने सागर अनिल साठे रा. बोकडा ता.येवला ह्या मजुराचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवालदार प्रकाश सोनवणे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने