इगतपुरी (जय योगेश पगारे) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकून महिलेवरील बलात्कार प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी आठही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आठ पैकी दोन दरोडेखोरांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. हा दरोडा सुनियोजित नसला तरी आरोपी हे सराईत गुन्हेगार मानसिकतेचे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी तपास कसा केला?
दरोडा व महिलेवर अत्याचार करून आरोपी कसारा रेल्वे स्टेशनच्या आधी आरोपींपैकी एकाने गाडीची साखळी खेचली. यावेळी तीन आरोपी पळून गेले. उर्वरीत पाच पैकी तीन कसारा स्टेशऩ आल्यावर उतरले. उर्वरीत दोन आरोपींना प्रवाशांनी पकडून ठेवले होते, कल्याण जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. या दोन आारोपींकडून पोलिसांनी माहिती घेतली आणि तपास सुरु केला.
रेल्वे पोलिसांचे तीन पथके आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी तपास सुरु केला. या गुन्ह्यातील आरोपी अरशद शेख, प्रकाश पारधी, अर्जुन परदेशी, किशोर सोनवणे, काशीनाथ तेलंग, आकाश शेनोरे, धनंजय भगत आणि राहूल आडोळे या आठही आरोपींनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कसा घडला होता गुन्हा?
आठ पैकी सात आरोपी हे नाशिक येथील घोटी टाके येथील आहेत. एक आरोपी मुंबईचा आहे. आकाश शेनोरे या सर्वांचा म्होरक्या आहे. सर्व आरोपींनी घोटी येथे मद्यपान केले. नंतर इगतपूरी रेल्वे स्टेशन येथे मद्यपान केले. तसेच गांजा ओढला होता नंतर ते इगतपूरी येथे पुष्पक एक्सप्रेसमध्ये चढले, त्यांनी दरोड्याचे काही प्लॅनिंग केले नव्हते पण सर्व आरोपी हे गुन्हेगारी मानसिकतेचे आणि सराईत असल्याची माहिती समोर आली आहे.
8 ऑक्टोबरच्या रात्री साडेसात वाजता लखनऊ सीएसटी पुष्पक एक्सप्रेसमध्ये डी टू या बोगीत दरोडा टाकण्यात आला. आठ दरोडेखोरांनी 16 प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल रोकड लूटली होती. मारहाणीत सहा प्रवासी जखमी झाले होते. नऊ प्रवाशांचे मोबाईल आणि सहा प्रवाशांची रोकड आणि एका महिलेवर दोन आरोपींनी लैगिंक अत्याचार केला होता.
साभार टी वी 9