📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

फर्क तो पड़ता है! मालेगाव लाईव्ह च्या बातमीच्या दणक्यानंतर डागडुजीला सुरुवात

मालेगाव ( जय योगेश पगारे) मालेगाव शहरातील सोयगाव भागात सुरू असलेल्या गटाराच्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता शिवाय रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होऊन मोठ मोठाले खड्डे पडले होते, या संदर्भात मालेगाव लाईव्ह कसमादे मीडियाच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करण्यात येत होता, काल सोयगाव भागात अनेक लहान मोठी वाहने फसली होती, मोठ्या जिकिरीने ती वाहने काढण्यात आली, 
बजरंग कॉलनी ते सोयगाव मराठी शाळेपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य होते, त्यामुळे सतत लहान-मोठे अपघात होते,
त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता, काल मालेगाव लाईव्ह ने यासंदर्भात वृत्त प्रसारित करून प्रशासनाला या परिस्थितीबाबत अवगत केले होते, त्यानुसार आज रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने