ज्ञानेश्वर आढाव (वार्ताहर) देवपुरपाडे
महालपाटणे ता.देवळा येथील अतिशय गरीब आदिवासी कुटुंबात आप्पांचा जन्म झाला. आप्पांना सुरूवातीपासून च समाजसेवेची आवड होती.लोकांच्या अडीअडचणी आप्पा सोडवत असत. पुढे कालांतराने लोकांच्या व समाजाच्या विकासासाठी आप्पांनी राजकारणात प्रवेश केला.आधी महालपाटणे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य,अशी राजकीय सुरुवात झाली.सन १९९९मध्ये विधानसभा चा बिगुल वाजला.त्यावेळी आप्पा काॅंग्रेस पक्षात होते.पण आयत्यावेळी आप्पाना काॅंग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारली.त्यावेळी कसमादेचे आरोग्य मंत्री स्वर्गीय दौलतराव आहेर (बाबा) यांच्या कडे महालपाटणे ग्रामपंचायत सरपंच अभिमान बापु आहिरे, द्वारकाधीश साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सावंत साहेब तसेच बागलाण तालुक्यातील वरिष्ठ नेते यांनी बाबांना गळ घालून आप्पाना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवून दिला. आणि सर्व बागलाण वासियांनी आप्पाना थेट विधानसभेत पाठवले.१९९९ते २००४ या कालावधीत आप्पानी आमदारकी सांभाळली.व त्या काळात बागलाणचा विकास ही केला.