राकेश आहेर | चांदवड देवळा
"आझादी की अमृत महोत्सव" च्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या मिनीस्ट्री ऑफ होम अफेअर्स (एम.एच.ए) मार्फत आयोजित सी.आय.एस.एफ च्या २६ जवानांच्या सायकल रॅलीचे चांदवड येथील एस. एन. जी. बी संस्थेत आगमन झाले. या सर्व जवानांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मोठ्या हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. ही सायकल रॅली पुण्याहून सुरू झाली असून तीची सांगता राजघाट दिल्ली येथे होणार आहे. आज रात्री हे सर्व जवान संस्थेच्या वसतिगृहात मुक्कामी राहणार असून उद्या सकाळी ९.३० वाजता स्वागत समारोह आटोपल्यावर ही रॅली पुढे दिल्लीकडे रवाना होणार आहे. यावेळी जवानांच्या रॅलीच्या स्वागतासाठी संस्थेमार्फत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एच.जैन, डॉ.दत्ता शिंपी, प्रा.मनोज पाटील, प्रा.कुदनर, प्रा.डॉ.तुषार चांदवडकर, प्रा.नायर तसेच मध्यवर्ती कार्यालयामार्फत मधुकर रौंदळ, विशाल त्रिवेदी, पंकज पगार व भुषण कोकंदे आदी उपस्थित होते.