मालेगाव, दि. 8 (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा): सार्वजनिक सण, उत्सव, सभारंभ आदीप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप व पेंडॉलच्या तपासणीसाठी पाच पथके गठीत करण्यात आल्याची माहिती उप विभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिक जिल्ह्यातंर्गत मालेगाव महानगरपालिका हद्दीमधील मंडप, पेडॉल तपासणी करण्यासाठी नियुक्त पथकातील अधिकारी त्यांचे पद व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
*तपासणी पथक सदस्य*
*संगमेश्वर पथक क्षेत्राचे* पथक प्रमुख उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, संपर्क क्र. 7038100050, तर सहायक म्हणून नायब तहसिलदार विकास पवार, संपर्क क्र. 8788132381, महानगपालीकेचे उपअभियंता, एस.पी.चौरे, संपर्क क्र. 9405612034, छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.पी.गायकवाड, संपर्क क्र. 9923028799.
*सोयगाव, भायगाव, कलेक्टर पट्टा, मालेगाव कॅम्प पथक क्षेत्राचे* पथक प्रमुख तहसिलदार चंद्रजित राजपूत, संपर्क क्र. 9422960258, तर सहायक म्हणून निवडणुक नायब तहसिलदार (मालेगाव मध्य 114) श्री. हांडोरे, संपर्क क्र. 8605345127, महानगपालीकेचे प्रभाग अधिकारी प्रभाग क्रं. 3 हरिष डिंबर, संपर्क क्रं. 9860987836, कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, दिगंबर पाटील, संपर्क क्रं. 9421509723.
*मनपा प्रशासकीय प्रभाग क्रं. 2 द्याने, रमजानपुरा पथक क्षेत्राचे* प्रथक प्रमुख धान्य वितरण अधिकारी, दत्तात्रय शेजुळ, संपर्क क्रं. 9527777080, तर सहायक म्हणून अवल कारकुन, नितीन विसपुते, संपर्क क्रं. 80087474855, महानगपालीकेचे उप अभियंता पाणी पुरवठा, सचिन माळवाळ, संपर्क क्र.9923391485, सहायक पोलीस निरीक्षक, बाळासाहेब थोरात, संपर्क क्रं. 8805907900.
*मनपा प्रशासकीय प्रभाग क्रं. 3 दरेगांव, सायने बु. पथक क्षेत्राचे* पथक प्रमुख विशेष कार्यकारी दंडाधिकारी अर्चना खेतमाळीस, संपर्क क्रं. 9011158555, तर सहायक म्हणून मंडळ अधिकारी एल.एम.निकम, संपर्क क्रं. 7798561274, महानगपालीकेचे कनिष्ठ अभियंता, मंगेश गवांदे, संपर्क क्रं. 9823070523, तालुका पोलीस ठाण्याचे, तालुका पोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक, डी. के. ढुमणे, संपर्क क्रं. 9921425063.
*मनपा प्रशासकीय प्रभाग क्रं. 4 मालधे पथक क्षेत्राचे* पथक प्रमुख महानगरपालीकेचे सहाय्यक आयुक्त, वैभव लोढे, संपर्क क्रं. 9561555144, तर सहायक म्हणून नायब तहसिलदार प्रशासन, डी.बी.वाणी, संपर्क क्रं. 7768013861, महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, एम.एन.गांगुर्डे, संपर्क क्रं. 9823072192, किल्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एच. भदाणे, संपर्क क्रं. 8108511811.
आगामी सार्वजनिक सण, उत्सवाकरिता उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी गठीत केलेल्या वरील पाचही पथकातील अधिकाऱ्यांची उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विजयानंद शर्मा यांनी बैठक घेतली. नेमून दिलेल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये तातडीने भेटी देवून विहीत नमुन्यातील मंडप तपासणी अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. त्याच बरोबर कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत सर्व गणेश मंडळांना मार्गदर्शन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
Tags
mmc