🔴 येवला | प्रशांत गिरासे
सध्या बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने भुरट्या चोरांनी आपला मोर्चा कांदा चोरीकडे वळविला आहे,
येवला तालुक्यातील रेंडाळा येथील कांदा उत्पादक डॉ अंकुश आहेर या शेतकऱ्याचे कांदे चोरीला गेले आहेत, चोरट्यांनी पिकअप भरून तब्बल 22 क्विंटल कांदे रातोरात चोरून पोबारा केला, त्यासोबत चाळीतील पाच कॅरेटभर असलेले कांद्याचे रोप,घामिले,औषधे या वस्तू देखील चोरून नेल्या आहेत, याबाबतची तक्रार आहेर यांनी पोलिसात दिली आहे,
सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या नेतृत्वात होत आहे, सध्या कांद्याचे भाव वाढत असल्यामुळे असे प्रकार होत आहे याआधी देखील तालुक्यातील अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहे यामुळे शेतकरी भुरट्या चोरांमुळे शेतकरी अडचणीत येऊ शकतो,
