मुंबई: (जय योगेश पगारे) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे. यासाठी उद्या शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेशपत्राबाबत प्रचंड गोंधळ होता, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात येऊन ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
या भरती प्रक्रियेबाबत न्यासा नावाच्या कंपनीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रियेचे काम दिले होते.
उमेदवारांना आलेल्या अडचणी
- परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही
- अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळालेच नाही
- प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही
- दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे अशक्य
- संकेतस्थळ अनेकदा हँग होत होते
आरोग्य विभागातील भरण्यात येणार असलेली पदे.
१) गट क : रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरीचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक
२) गट ड : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष/स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस आदी.
दरम्यान अनेक परीक्षार्थी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जाण्यासाठी आदल्या दिवशीच जाऊन पोहोचले होते, परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे,
परीक्षार्थींना एसएमएसद्वारे परीक्षा रद्द झाल्याचे मेसेजेस पाठविण्यात आले आहे