कायदेविषयक साक्षरता ही काळाची गरज- उन्मेश बी. श्रीराम
के.बी.एच.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथे आंतरराष्ट्रीय साक्षर दिनाच्या औचित्य साधून मालेगाव तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रवीण पाटील होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उन्मेश बी. श्रीराम दिवाणी न्यायाधीश मालेगाव, अॅड. बाळासाहेब पाटील अध्यक्ष मालेगाव वकील संघ, अॅड.निलेश पाटील सचिव मालेगाव वकील संघ, सिरीन मेश्राम, रुपेश बधान, तालुका विधी सेवा समिती कर्मचारी योगेश नेमणार, महेश अहिरे, काकळी,उपप्राचार्य रवींद्र शिरूडे,उपप्राचार्य राजेंद्र पाटील,पर्यवेक्षक नितीन गवळी, पर्यवेक्षक संजय शिंदे, पर्यवेक्षक सुभाष निकम व्यासपीठावर उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते विद्येची देवता माता सरस्वती ,कर्मवीर भाऊसाहेब हिरे, लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यालयाच्या वतीने प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिवाणी न्यायाधीश उन्मेश बी. श्रीराम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी अॅड.बाळासाहेब पाटील व अॅड निलेश पाटील यांनी साक्षरता दिनाचे महत्त्व सांगून कायदेविषयक साक्षरता कशा पद्धतीची असते या संदर्भात मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथी तथा व्याख्याते उन्मेश बी. श्रीराम दिवाणी न्यायाधीश मालेगाव यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे महत्त्व विशद करून कायदेविषयक साक्षरता या संदर्भात जनजागृती कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले व कायदेविषयक साक्षरतेची जनजागृती करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक विशाखा समितीच्या प्रमुख प्राध्यापिका श्वेता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेंद्र शेवाळे यांनी केले. आभार प्रसिद्धी विभागाचे प्रमुख राजेश धनवट यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील सूर्यवंशी, हेमंत पगारे, जे. टी. ठाकरे, योगेश गांगुर्डे, एस.डी. महाले ,आनंद भालेराव ,शिक्षकेतर बंधू आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच के.बी. एच. विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्ताने कायदेविषयक शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.