(मालेगाव) येथील जे ए टी महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे दरवर्षी हा दिवस विविध उपक्रमांद्वारे द्वारे साजरा केला जातो. यावर्षी या दिनाचे औचित्य साधून इंग्रजी विभागातर्फे *लिटरसी इन इंडिया* या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आणि आपले विचार प्रगट केले. त्याचबरोबर यानिमित्ताने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अन्सारी मोहम्मद हारुण मोहम्मद रमजान हे होते. महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. सलमा अब्दुल सत्तार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थिनींना आपल्या व्याख्याना द्वारे मौलिक मार्गदर्शन केले. इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. सुनेत्रा मेश्रामकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला आणि सूत्रसंचालन केले. कुमारी अन्सारी सबाहत हिने आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.