मालेगाव (राकेश पाटील ) : तालुक्यातील कुकाणे येथील रेणुकादेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य, सायन्स महाविद्यालयात सोमवारी (दि.१२) रोजी पहिले हास्य कविसंमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य शरद लोंढे यांनी दिली.
या हास्य कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी पोपटराव लोंढे राहणार आहेत. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी संतोष कांबळे असतील. विशेष अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी आत्माराम अहिरे, वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक देवेंद्र शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कवी संमलेनात कवी काशिनाथ गवळी, शैलेश चव्हाण, सोमदत्त मुंजवाडकर, जयराम मोरे, विवेक पाटील, समाधान भामरे, गौतम जगताप, समाधान शिंपी सहभागी होणार आहेत. या हास्य कविसंमेलानाचा लाभ घ्यावा असे आवाहन ही प्राचार्य लोंढे यांनी केले आहे.