मागील वर्षांपासून बंद असलेले सर्व धार्मिक स्थळे - राज्यसरकारने येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास अनुमती दिली आहे मात्र कोविडचं संकट अजून संपल नाही - त्यामुळे यासाठी रारकरने अनेक नियम जाहीर केले आहेत
कशी आहे नियमावली ?
सर्वानी मास्क घालावा - ज्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत, फक्त त्यांनाच धार्मिक स्थळांच्या परिसरामध्ये प्रवेश मिळेल
धार्मिक स्थळात एकाच वेळी किती जणांना प्रवेश द्यायचा ते ट्रस्ट ठरवणार - धार्मिक स्थळांमध्ये आत आणि बाहेर पडण्याचे वेगवेगळे मार्ग असावेत.
धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करताना - प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीत कमी 6 फुटाचं अंतर असावे - सॅनिटायझर तसच स्क्रिनिंगची व्यवस्था करणे अनिवार्य असेल
एअर कंडिशन 24 ते 30 अंश सेल्सि. एवढंच ठेवावे - मुर्ती तसेच धार्मिक ग्रंथाना हात लावता येणार नाही
भजन, किर्तन किंवा इतर धार्मिक गायन पूर्णपणे बंद असेल. पण धार्मिक गीतं वाजवता येतील - महत्वाचे म्हणजे धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद वाटणे पूर्णपणे बंद असेल