मुंबई ( जय योगेश पगारे )
कोरोना महामारी मुळे मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, ऑनलाईन शाळा सुरू असल्या तरी पाहिजे तेवढं विद्यार्थ्यांचे मन रमत नव्हतं, शाळेची सर, घरबसल्या अभ्यासाला येणार नाही हे शाश्वत सत्य आहे.
महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार आहेत.
कोरोना प्रादुर्भाव मुळे राज्यातील शाळा बंद होत्या. परंतु आता शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवला होता, अखेर मुख्यमंत्र्यांनी यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच बहुतांश ठिकाणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.