📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

शिक्षकी पेशाला काळिमा, 8 वर्षीय चिमुरडीवर खासगी शिकवणी चालकाकडून अत्याचार, कल्याण येथील घटना

कल्याण (जययोगेश पगारे) शिक्षक म्हटलं की गुरु, गुरुजनांचा आदर हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मनात असतो,  ज्ञानदानासाठी स्वतःला समर्पित केलेल्या व्यक्तीला शिक्षक किंवा गुरु असे संबोधले जाते, परंतु या पवित्र कार्याची प्रतिमा अशा काही नराधम लोकांमुळे मलीन होते,  
दरम्यान शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे, डोंबिवलीतील अत्याचाराची घटना ताजी असतानाच कल्याण मध्ये हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आठ वर्षीय चिमुरडीवर नराधमाने लैगिंक अत्याचार केले आहेत. खासगी शिकवणी शिक्षिकेचा पती मुदर तालवाला याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दीड महिन्यापासून मुदर सदर बालिकेवर अत्याचार करीत होता. मुदरची पत्नी माहेरी गेली असता मुदर मुलींची शिकवणी घेत होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण पश्चिमेकडे राहणारी ८ वर्षीय चिमुरडी एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या पती पत्नीकडे शिकवणीसाठी जात होती. दीड महिन्यापूर्वी मुदर तालवाला याची पत्नी बाहेरगावी गेली असून तेव्हापासून मुदर एकटाच विद्यार्थ्याची शिकवणी घेत होता. मात्र यातील एका ८ वर्षीय चिमुरडीशी शिकवणीदरम्यान गैरवर्तन करत मुदर याने तिच्याशी लैगिक अत्याचार केलाक।

 या घटनेनंतर एक दिवस चिमुकलीने शिकवणीसाठी जाण्यास नकार दिला आणि रडण्यास सुरुवात केली. यावेळी तिला पालकांनी विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.
यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

        Photo courtsy : मुलुख मैदान

 या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बाजारपेठ पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४२ वर्षीय शिक्षक मुदर तालवाला याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असून त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

🔴  एका अल्पवयीन मुलीवर २९ जनांचा अत्याचार
दरम्यान डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर गेल्या ९ महिन्यांपासून अनेक ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणात एकूण २९ जण या मुलीवर अत्याचार करत होते. या मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवून या व्हिडीओ च्या आधारे या मुलीला ब्लॅकमेल केले जात होते. तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २ अल्पवयीन आरोपीसह २३ जणांना अटक केली आहे. तर, उर्वरित ६ आरोपीचा शोध सुरू आहे. ही माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने