📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

आपल्याच कार्यालयातून निवृत्त झालेल्या सहकाऱ्याकडून लाच घेताना नाशिकमधील दोन लिपिकांना रंगेहाथ पकडले

नाशिक (प्रशांत गिरासे) जिल्ह्यात लाचखोरीची अनेक प्रकरणे प्रकाश झोतात असताना  त्यावर कारवाई झालेली असताना सुध्दा, जिल्ह्यातील निर्लज्ज लाचखोरांची मुजोरी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत, यातच निवृत्तीनंतर पेन्शन आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्याच्या कामासाठी आपल्याच कार्यालयातून निवृत्त झालेल्या सहकाऱ्याकडून लाच घेताना नाशिकमधील दोन लिपिकांना रंगेहाथ पकडण्यात आली आहे.
निवृत्तीनंतर पेन्शन आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्याच्या कामासाठी आपल्याच सहकाऱ्याकडून या दोघांनी लाच मागितली होती. या प्रकाराने धक्का बसलेल्या निवृत्त कर्मचाऱ्याने त्यांना धडा शिकवायचं ठरवलं. कर्मचाऱ्याने तक्राल दाखल केल्यानंतर सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला त्यांचे सेवापुस्तक पडताळणी, रजेतील फरकांचे बिल यासह अन्य कामं करायची होती. त्यासाठी निवृत्त झाल्यानंतर ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सतत खेटे घालत होते. मात्र त्यांचं काम काही पुढे सरकत नव्हतं. कुठलं ना कुठलं कारण सांगून त्यांचं काम टाळलं जात होतं. त्यानंतर हे काम करण्यासाठी कार्यालयातील १) प्रविण नामदेव पिंगळे, मुख्य लिपीक, २) श्रीमती लता शांताराम लहाने, (बोडके) वरिष्ठ लिपीक, दोन्ही नेमणुक कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर विभाग) कार्यालय नाशिक, जि. नाशिक यांना १०,००० /- रूपये लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई
या प्रकारानंतर निवृत्त कर्मचाऱ्याने एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने सापळा रचला आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील हालचालींवर लक्ष ठेवलं. निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांनी पैसे घेऊन कार्यालयात जायला सांगितलं. लाच स्विकारत असतानाच मुख्य लिपिक प्रवीण नामदेव पिंगळे आणि वरिष्ठ लिपिक लता शांताराम लहाने (बोडके) यांना अटक करण्यात आली. नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत विभागाकडून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जात आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी झालं नसल्याचंच यातून दिसून येत आहे. ज्या कार्यालयात कर्मचाऱ्याची हयात गेली, त्याच कार्यालयात त्याला लाच मागितली जात असेल, तर सर्वसामान्यांचं काय होत असेल, अशी चर्चा नाशिककरांमध्ये रंगली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने