📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

चोरांकडून वयोवृद्ध शेतकऱ्याचा खून, जायखेडा पोलीसांची 'क्विक ऍक्शन', तासाभरात मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

🔴मालेगाव | मनोहर शेवाळे
 📍 चोरांकडून वयोवृद्ध शेतकऱ्यावर धारदार कुर्‍हाडीने वार करून खून
📍 जायखेडा पोलिस ठाण्यातील अधिकारी  श्रीकृष्ण पारधी यांची समय सूचकता
📍  वेळेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळा जवळूनच मारेकऱ्याला पकडले

वयोवृद्ध शेतकऱ्यावर धारदार कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना बागलाण तालुक्यातील कोटबेल येथे घडली. बुधवार (दि.२२) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून अवघ्या तासाभरात जायखेडा पोलिसांनी मारेकऱ्यास बेड्या ठोकल्या असून एक संशयित फरार झाला आहे. सहादू प्रल्हाद खैरनार (वय ७७) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत जायखेडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोटबेल येथील घुबडदरा शिवारात शेतकरी खैरनार दांम्पत्य शेतात वास्तव्यास होते. बुधवारी (दि.२२)
मयत - सहादू प्रल्हाद खैरनार

रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या घरात शिरुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी खैरनार यांना जाग आल्याने त्यांची संशयितांसोबत झटापटी झाली. या झटापटीत संशियितांने त्यांच्या डोक्यात धारदार कुऱ्हाडीने वार करुन त्यांना ठार मारुन घटनास्थळावरुन पोबारा केला. मात्र याचवेळी खैरनार यांचा पुतण्या शेताकडे जात असतांना त्याला गस्तीवर असलेल्या जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी थांबवित विचारणा केली. काकांना कोणीतरी मारहाण केली असल्याचे त्यांने सांगितल्यानंतर पारधी यांनी वेळ न घालविता त्याच्यासोबत शेताच्या दिशेने माग्रक्रमण केले. मात्र ऐनवेळी शेताकडून दोन संशयित पिकांमधून येत असल्याचे पारधी यांच्या लक्षात येताच त्यांनी त्यांचा पाठलाग करीत एका संशयितास ताब्यात घेतले तर अन्य एक फरार झाल्याचे समजते. संशयित मारेकरी धुळे जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस फरार संशयिताचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अवघ्या तासाभरात मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्याने त्यांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतूक होत आहे.
📍 एपीआय- श्रीकृष्ण पारधी 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने