📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

मापात पाप! पिंपळगाव बाजार समितीत वजन काट्याला दगड बांधणार्‍या व्यापाऱ्याकडून होणारी लूटमार चव्हाट्यावर!

शेतकऱ्यांनीच केला व्यापाऱ्याचा पर्दाफाश

🔴 प्रशांत गिरासे | पिंपळगाव बसवंत

चक्क वजन काट्याला खाली दगड बांधून शेतकऱ्यांची व्यापारी दिवसाढवळ्या लुट करत होता आणि याचा पर्दाफाश शेतकरी बांधवांनी केला असून यावर बाजार समिती प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे

नाशिक जिल्ह्यात टॉमेटो चा हंगाम सुरू होताच आठवडे भरातच दर कोसळले कवडी मोल दर दर्जेदार टमाटो ला मिळू लागल्याने  टमाटा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता 

 गाडी भाडे द्यावे की शेतमजुरांची मजुरी ,इंधन दरवाडीने देखील शेतमाल दळणवळण करणे मुश्किल झाले आहे आणि त्यात कवडीमोल दरामुळे दर्जेदार टॉमेटो रस्त्यावर फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आली होती मात्र अनंत चतुर्थी झाल्यावर दरात सुधारणा झाली आहि कुठेतरी टमाटो ला भाव मिळू लागले मात्र व्यापारी कशाप्रकारे शेतकऱ्यांची लूट करू लागले ते देखील शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चव्हाट्यावर आले

✅️ व्हिडीओ बघा 📍


पिंपळगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून वजन काट्याला दगड बांधण्याचे षड्यंत्र शेतकऱ्यांनी हाणून पाडले आहे.आता  बाजार समिती प्रशासनाने  संबधित व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करत त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी  शेतकरी वर्गाकडून होत आहे



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने