📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

रामेश्वर कृषी मार्केट खारीफाटा येथे खरीप हंगामातील लाल कांद्याचा लिलावाचा शुभारंभ

राकेश आहेर | चांदवड देवळा
     देवळा तालुक्यातील रामेश्वर कृषी मार्केट खारीफाटा येथे सोमवारी प्रथमताच खरीप हंगामातील लाल कांद्याच्या पहिल्या ट्रॅक्टरचा शुभारंभ झाला असुन कांद्याला ३१३१ रुपये सर्वोच्च  दर मिळाला आहे.
  दरवर्षी साधारण दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर लाल कांद्याचा शुभारंभ होत असतो यावर्षी मात्र पाऊसाचे प्रमाण कमी प्रमाणात होते तसेच चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील जमीन मध्यम, हलकी पावसाळी कांद्यासाठी योग्य असल्याने  पावसाळी लाल कांदा १५ ते २० दिवस लवकर बाजारात आला अशी मार्केटमध्ये शेतकऱ्यांत चर्चा सुरू होती.
  चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील शेतकरी कौतीक राजाराम जाधव यांच्या शेतातील हा लाल कांदा होता. प्रथमताच लाल कांदा रामेश्वर कृषी मार्केट खारीफाटा ता. देवळा येथे आल्यामुळे कांद्याचे पुजन करून शेतकऱ्याचा मार्केट कमिटीमार्फत शाल, टोपी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
  यावेळी मार्केट कमिटीचे सर्वेसर्वा खंडूकाका देवरे, प्रकाश कांतीलाल, सचिव शिंदे, दर्शन पाटील, तसेच व्यापारी, मापारी,आडते, हमाल, मार्केट कमिटीचे सर्व संचालक मंडळ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नविन लाल कांद्याचे आगमन जरी झाले असले तरी जुन्या उन्हाळ कांद्याच्या दरावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपल्याकडे असलेल्या उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता लक्षात घेऊन टप्याटप्याने विक्रीसाठी आणावा.
         खंडू काका देवरे
-अध्यक्ष व्यापारी असोसिएशन नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने