मालेगाव ( मनोहर शेवाळे | सचिन पगारे ) तालुक्यातील वडगाव गावाजवळील दसाने ओवाडीनाला रोड येथे योगेश प्रदीप भावसार यांच्या मालकीच्या उसाच्या शेतात बिबट्या असल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाला कळवली त्यानुसार काल या परिसरात पिंजरा लावण्यात आला होता व आज बिबट्याला पकडण्यात यश आले.
या बाबत सविस्तर माहिती अशी की शेतकरी दीपक शेलार, कोमलसिंग ठोके, वाल्मीक चव्हाण, किरण राजकोर, रंगनाथ बाबा खैरनार यांना मागील काही दिवसात बिबट्याचे दर्शन झाले होते, तसेच या बिबट्याने परिसरातील अनेक जनावरे फस्त केली होती, त्यानुसार गावातील प्रशासनातर्फे सदर माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली होती, या विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक वेळा घटनास्थळी भेट दिली होती, परंतु त्या वेळी फटाके फोडले, त्यावेळी सर्वांना वाटले की बिबट्या पळून गेला, पर्यंत पुन्हा बिबट्या दिसल्याने सदर माहिती कृषिमंत्र्यांना कळविण्यात ली व त्यांनी वनविभागाला सूचना दिल्या, वनविभागाने तातडीने कार्यवाही करत या परिसरात पिंजरा लावून ठेवला होता, आणि पुन्हा भक्ष्याच्या शोधात असलेला हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला,
यावेळी पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, या परिसरात पहिल्यांदाच बिबट्या आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहल व घबराट असे वातावरण आहे,

यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर बिबट्याला दसाने वनपरिक्षेत्रात नेल्याचे समजते.
परिसरात आणखी दोन बिबटे असल्याची अफवा नागरिकांमध्ये पसरली आहे परंतु त्यामध्ये किती तथ्य आहे हे वेळच ठरवेल पण तरीही वन विभागाचे अधिकारी या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत.
