📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

तपासावर परिणाम करण्याचा आरोप: अनिल देशमुख यांच्या वकीलाला सीबीआयकडून अटक

मुंबई (प्रतिनिधी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा  यांना सीबीआयने मुंबईत अटक केली. पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून तपासावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप डागांवर लाऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.
वकील आनंद डागा यांना सीबीआयकडून रात्री उशिरा अटक केली असून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर सीबीआयने सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी याला यापूर्वी अटक केली आहे. तिवारी आणि डागा यांनी प्राथमिक चौकशी अहवालात फेरफार करून आणि संगनमत करून अनिल डागा यांनी तो अहवाल समाज माध्यमातून प्रसारीत केला आहे, असा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार डागा यांना अटक करण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने