📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

ही महामारी लवकर जाणार नाही ! WHO, कोरोना चे नवनवीन वेरियंट ठरत आहेत घातक!

जगातील सर्व देश सध्या कोरोनाच्या डेल्टा वेरियंटचा सामना करत आहेत. त्यातच आता करोना व्हायरसमध्ये झालेल्या नव्या बदलामुळे चिंता खूपच वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेसह इतर अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवीन वेरियंट आढळून आला आहे. सदर नवीन वेरियंट अत्यंत संसर्गजन्य असू शकतो. कोरोनावरील लसीपासून मिळणाऱ्या प्रतिकारशक्तीलाही हा वेरियंट चकवा देखील देऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. यामुळे हा नवीन वेरियंट किती धोकादायक आहे, याचा अंदाज लावता येईल.

कोरोनाचा हा नवीन C.1.2 वेरियंट मे मध्ये आढळून आला होता. तेव्हांपासून १३ ऑगस्टपर्यंत हा C.1.2 नवीन वेरियंट चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्वीत्झर्लंडमध्ये आढळून आला आहे, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसिज आणि क्वाझुलु – नॅटल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेंसिंग प्लॅटफॉर्मच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान आढळून आलेल्या करोनाच्या C.1 वेरियंटच्या तुलनेत C.1.2 या नवीन वेरियंटमध्ये मोठे बदल आढळून आले आहेत. कोरोनाच्या C.1.2 या वेरियंटला इतर वेरियंट प्रमाणे वेरियंट ऑफ इंट्रेस्टच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. C.1.2 वेरियंटमध्ये इतर वेरियंटच्या तुलनेत अधिक बदल दिसून आले आहेत. कोरोनाचा हा वेरियंट अत्यंत संसर्गजन्य असू शकतो. हा वेरियंट कोरोनावरील लसीपासून मिळणारे सुरक्षा कवचही भेदू शकतो, अशा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

आगामी काळात करोनाचे आणखी नवीन वेरियंट समोर येतील, असा इशारा WHO आधीच दिला आहे. तसेच जगातून ही महामारी लवकर संपणारी नाही, असे देखील WHO म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर करोनाच्या या नवीन वेरियंटने चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या डेल्टा वेरियंटने रोज शेकडो नागरिकांचा अजूनही मृत्यू होत आहे. यामुळे संपूर्ण लसीकरणानंतरही सावध राहण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने