चाळीसगाव (जय योगेश पगारे) एकीकडे चाळीसगाव औरंगाबाद रस्त्यावर कन्नड घाटात मोठी दरड कोसळून अनेक वाहने यात अडकले असताना दुसरीकडे औरंगाबाद मध्ये देखील पावसाने थैमान घातले जोरदार पावसानंतर औरंगाबाद मधील भिलदारी पाझर तलाव फुटलय यानंतर नागद परिसरात भीषण पूर आला आहे. आजूबाजूचा परिसर संपूर्ण जलमय झाला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सोमवारी रात्रीपासूनच आता पुन्हा एकदा राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जामनेर या भागासह लगतच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड सोयगाव, सिल्लोड तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. या भागात आलेल्या पुरामुळे नदीकाठी असलेल्या मंदिरात एक पुजारी अडकला होता या पुजाऱ्याला मंदिर फोडून नागरिकांनी बाहेर काढण्याची माहिती मिळते आहे , मोठ्या प्रमाणातील पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता तसेच नदी तरी भरपूर मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होता त्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता नागद गावातील मंदिराचा दरवाजा बंद झाल्यानंतर गावकऱ्यांनी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन राबवत स्लॅब फोडून पुजाऱ्याला बाहेर काढले आहे.
चाळीसगाव, कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी झालीय. ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला, तर कन्नड चाळीसगाव घाटात दरड कोसळली. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार माजलाय. ढगफूटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय. नागद गावातील 30 ते 40 गाई म्हशींचा मृत्यू झालाय. पुराच्या पाण्यात फसून गाई म्हशींचा मृत्यू झाला आहे नदीच्या काठावरील गोठ्यात बांधलेल्या गाई म्हशींचा मृत्यू झाला. भिलदारी धरण फुटल्यामुळे नदीला जोरदार पूर आला होता. यात हे नुकसान झालं.