मालेगाव कॅम्प (किरण बागुल) महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या मार्गदर्शन सूचनेनुसार तसेच आर बी एच कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्या मा सौ प्रमिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्रिडा शिक्षक श्री शेलार एस बी यांच्या अध्यक्षतेखाली दि 29 ऑगस्ट रोजी विश्वविख्यात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंह यांची जयंती राष्ट्रीय क्रिडा दिवस म्हणून विद्यालयात साजरी करण्यात आली. विद्यालयातील अधिकारी वर्गामार्फत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नितीन गायकवाड यांनी केले. शेवटी अध्यक्षीय भाषण झाले.
(An online lecture and essay competition was organized at the RBH School on the occasion of National Sports Day )
राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विद्यालयात ऑनलाईन व्याख्यान आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यालायतील क्रिडा शिक्षक श्री विलास मोरे सर यांनी प्रास्ताविक करून क्रिडा शिक्षक श्री नितीन गायकवाड यांनी मेजर ध्यानचंद सिंह यांच्या बद्दल माहिती सांगणारा एक व्हिडिओ तयार करण्यात आला. हा व्हिडिओ ऑनलाईन पध्दतीने यु ट्यूबच्या माध्यमातून पालक व विद्यार्थिनी यांना बघण्यासाठी पाठविण्यात आला.
तसेच राष्ट्रीय क्रिडा दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यालयामार्फत निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला तीन विषय देउन दोन गटात निबंध स्पर्धा घेण्यात आली आणि संस्था स्थरावर बक्षिसे देण्यात येणार आहे. तसेच संस्था निवडक निबंधाचे संकलन करून एक पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय क्रिडा दिन साजरा करण्यासाठी विद्यालयातील प्राचार्या सौ प्रमिला पाटील, उपप्राचार्या सौ सुचारिता ठाकरे, उपमुख्याध्यापिका सौ साळुंखे आर जे, पर्यवेक्षिका सौ ठाकरे एल जे व सौ शेवाळे पी एस, क्रिडा शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन क्रिडा शिक्षक श्री नितिन गायकवाड यांनी केले आणि आभार श्री विलास मोरे यांनी मांडले.