काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात ९५ अफगाणी नागरिक व १३ अमेरिकी सैनिक ठार झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याला जबाबदार असलेल्या इस्लामिक स्टेटला (ISIS) त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले केले. यासंदर्भातील माहिती पँटागॉनने दिली आहे.
अमेरिकेने मानवरहित विमानाच्या माध्यमातून आयएस या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे बॉम्बहल्ले करून सूत्रधाराला ठार केले
अफगाणिस्तानातील काबूल विमानतळावर बॉम्बस्फोटात १३ अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेने पलटवार केला आहे. अमेरिकेने सांगितल्याप्रमाणे आयएसच्या दहशतवाद्यांवर हवाई हल्ला करून हल्ल्याच्या मुख्य सूत्रधाराला कंठस्नान घातले. पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार, यूएस सेंट्रल कमांडचे प्रवक्ता म्हणाले कि हा हल्ला मानव विरहित ड्रोन च्या सहाय्याने अफगाणिस्तानच्या
नंगहर प्रांतात करण्यात आला.