📰 CONTACT📰 PRIVACY POLICY 📰 DISCLAIMER 📰TERMS 📰मालेगाव 📰नाशिक 📰महाराष्ट्र 📰 देश

महापालिकेतर्फे प्रत्येक आस्थापनेत आता मालक- कर्मचाऱ्यांची RTPCR टेस्ट होणार?

मालेगाव ( जय योगेश पगारे - कसमादे मीडिया न्यूज नेटवर्क )

          कोरोनाचा समूळ नायनाट करण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली आहे, अनलॉक चा तिसरा स्तरामध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे, त्यामुळे वेळेचे बंधन ठेवून आस्थापनांना व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे, परंतु अशातच बरेच व्यवसायिक कोरोना विषयक सर्वच नियमांचे पालन करताना दिसत नाही, त्यामुळे परिस्थिती पुन्हा गंभीर होऊन कोरोना वाढण्याची भीती निर्माण होऊ शकते या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे प्रत्येक  ठिकाणी जाऊन त्या आस्थापनेतील मालक, कर्मचाऱ्यांचा rt-pcr टेस्ट करण्यात येणार आहे, ज्यामुळे कोरोना वाढीवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे, बरेचसे नागरिक सौम्य किंवा लक्षणे नसलेले कोरोना बाधित असतात, व ते समाजात मुक्तपणे वावरत असतात अशा लोकांची प्रतिकारक्षमता चांगली असल्याने त्यांना कुठल्याही प्रकारची कोरोना ची लक्षणे अथवा त्रास होत नाही परंतु अशामुळे दुसऱ्यांना बाधा होऊन त्यांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता असते, त्यामुळे असे व्यक्ती ग्राहक बनून दुकानात जातात त्यावेळी ते कोरोना विषयक नियमांचे पालन करतीलच असे नाही, ज्यामुळे आस्थापनेत काम करणारे अथवा मालक बाधित होऊ शकतात आणि त्यांच्यामुळे दुकान / आस्थापनेत  इतर येणारे निरोगी नागरिकही कोरोना बाधित होऊ शकतात, त्यामुळे महापालिकेतर्फे हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे

 आज महापालिकेचे कर्मचारी लोढा मार्केट परिसरात  स्वॅब घेताना आढळून आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने